म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणाऱ्या बऱ्याच जणांना आता ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच एस.आय.पी. याविषयी सांगण्याची गरज उरलेली नाही. मात्र याच्या अगदी विरुद्ध दिशेने काम करणाऱ्या एका रणनीतीची माहिती देणे आवश्यक आहे.
एस.आय.पी. या माध्यमातून आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवत असतो. जसजसे त्याचे परतावे (Returns) वाढतात तसे आपल्या पोर्टफोलिओचे मूल्यांकन (Valuation) वाढते. म्हणजेच संपत्ती निर्मितीसाठी याचा वापर नक्कीच केला जातो. पण ज्यांना निवृत्ती पश्चात निवृत्तीवेतनाची सुविधा नाही त्यांनी कमावलेले पैसे सिस्टिमॅटिक पद्धतीने कसे वापरावे हे समजत नाही त्यांच्यासाठी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) फायदेशीर ठरतो.

एका उदाहरणाने समजून घेऊ.
एखाद्या व्यक्तीकडे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बरेच वर्ष गुंतवलेले किंवा एक रकमी (Lumpsum) गुंतवण्यासाठी तयार असलेले 50 लाख रुपये आहेत. 2030 मध्ये एस.डब्ल्यू.पी. सुरू करायचा विचार आहे आणि दर महिन्याला 25 हजार रुपये वापरण्यासाठी काढायचे आहेत जर 15 वर्षांसाठी असे नियोजन करायचे असेल तर तुम्ही एकूण 45 लाख रुपये वापरण्यासाठी काढाल आणि उरलेले पैसे दर वर्षाला आठ टक्के दराने वाढतील असे धरले तर त्याचा निधी (Fund) वेगळा तयार होईल.
एस डब्ल्यू पी नेमका कोणत्या वयोगटासाठी
तुमचे वय लहान असेल तर एस डब्ल्यू पी करण्याऐवजी जमतील तेवढे पैसे इन्व्हेस्ट करून आपला मोठा कॉर्पस तयार करायचा.
मात्र ज्यांचे वय पन्नाशीच्या आसपास असेल त्यांनी सिरीयसली एस डब्ल्यू पी साठी कॉर्पस जमा करायला सुरुवात करायला हवी. कॉर्पस जमा झाला तरच तुम्हाला एस डब्ल्यू पी चा विचार करता येतो
एस डब्ल्यू पी कधी करता येते ?
तुमच्या दर महिन्याच्या मासिक खर्चाचा आढावा घेतल्यास आणि तो खर्च दरवर्षी किती रुपयांनी वाढेल हे गृहीत धरल्यास तुम्हाला एस डब्ल्यू पी ची रक्कम ठरवता येते. समजा दर वर्षाला तुम्ही काढून घेत असणारे पैसे पाच टक्क्याने वाढणार असतील तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य नक्कीच त्यापेक्षा जास्त दराने वाढले पाहिजे. म्हणजेच
पहिली अट अशी की तुमचं मुद्दल भरपूर असले पाहिजे, ज्यायोगे दीर्घकाळासाठी एस.डब्ल्यू.पी. सुरू ठेवता येईल. नाहीतर 20 लाख रुपये एस डब्ल्यू पी साठी साठले असतील. त्यातून दर महिन्याला तीस हजार रुपये काढून घ्यायला सुरुवात केली तर पाच वर्षातच 20 लाखाचे साडेसात लाखच उरणार आहेत, म्हणजेच एस.डब्ल्यू.पी. जास्त वर्षे सुरू ठेवता येणार नाही.
दुसरी अट एस.डब्ल्यू.पी. साठी जो निधी जमवला आहे तो डेट गुंतवणुकीमध्ये ठेवला तर त्यावर अंदाजे आठ टक्क्यापर्यंत परतावा (Return) मिळतो. याउलट तो हायब्रीड इक्विटी फंड किंवा इक्विटी फंडात असेल तर तुमचा निधी सुद्धा वाढत राहतो ज्यायोगे तुम्हाला जास्त वर्षांपर्यंत पैसे वापरता येतात.
एस डब्ल्यू पी चे नियोजन कोणत्या वर्षी सुरु करावे
साधारणपणे गुंतवणूक फळाला येण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे तुमचे निवृत्तीचे वय काय असणार आहे यावरून तुम्हाला सुरुवात कधी करायची याचा निर्णय घेता येईल. आजकालच्या तरुण वर्गाला साठीपर्यंत काम करण्यात रस नसून लवकरच सेवानिवृत्त होऊ या अशा प्रकारचे विचार व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. त्या परिस्थितीत वयाच्या चाळिशीतच दरमहा बारा हजार रुपये पंधरा वर्षासाठी इक्विटी योजनेमध्ये गुंतवले आणि त्यावर 12% परतावा मिळेल असे अपेक्षित धरले तर 55 वर्ष वय होईपर्यंत 60 लाख रुपयापर्यंत रक्कम जमते आणि हीच रक्कम पुढे एस डब्ल्यू पी या माध्यमातून वापरता येऊ शकते.
एस. डब्ल्यू. पी. साठी आधी एस. आय. पी. हवी हे सूत्र विसरू नका !
एस आय पी करताय ? हे माहित असायलाच हवे !
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
एसआयपी सुरू कशी करायची ?
गुंतवणूकीचे ग्लोबल फंडे !
शेअर मार्केट ? शास्त्र असतं ते ! थ्रील नाही
एस.डब्ल्यू.पी नक्की कोणत्या वयोगटासाठी ?
एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ?