Skip to main content

yereyerepaisa.com

Mutual Fund

एस.आय.पी. नक्की किती वर्षांसाठी करायची ? 

शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था या दोघांमध्ये एक साम्य म्हणजे दोघांनाही चक्राकार (Cyclical Flow) गती असते. तेजी आणि मंदी या घटकांनी बाजार चालत असतात. अर्थव्यवस्थेत मरगळ येणे, महागाई वाढणे, कॉर्पोरेट कंपन्यांचे नफ्याचे आकडे असमाधानकारक असणे, सरकारी पातळीवर एखादा अप्रिय निर्णय घेतला जाणे, युद्धजन्य परिस्थिती उद्भवणे, आंतरराष्ट्रीय बाजारात नकारात्मक घडामोड घडणे यामुळे शेअर बाजाराला धक्का बसतो व तो गडगडू लागतो.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानच्या माध्यमातून पैसे गुंतवणे कायमच श्रेयस्कर म्हटले जात असले तरीही त्यातून मिळणारे रिटर्न  तयार होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये मार्केट पडले आणि फंडांची एन.ए.व्ही. खाली आली की आपल्याला जास्त युनिट्स मिळतात.

या वेळेला अधिक पैसे गुंतवून जास्तीत जास्त युनिट जमा करायचे असतात. खालच्या भावाला युनिट्स घेऊन ठेवले की त्याचा फायदा मार्केट वर गेल्यावर होतो. 

तुमचा पोर्टफोलिओ मध्यम ते दीर्घकाळपर्यंत पैसे गुंतवत राहून त्यानंतर मिळणारे रिटर्न अनुभवण्याचा अशा पद्धतीचा आखलेला असेल तर अवघ्या तीन वर्षात परतावा मिळत नाही अशी ‘तक्रार’ करणे हेच मुळी योग्य आहे असे मला वाटत नाही. 

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी संपत्तीनिर्मितीसाठी ( Wealth Creation) करायच्या असतील तर त्यासाठी संपत्ती संचय होईल एवढा कालावधी सुद्धा मिळायला हवा.

तुम्ही विचारलेल्या प्रश्नातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी एक मोलाचा मंत्र मिळालेला आहे तो म्हणजे ‘दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एस.आय.पी.चा वापर केल्यास त्याची फळे मिळण्यासाठी किमान पाच ते सात वर्षे थांबण्याची तयारी असायला हवी. 

खाली दिलेल्या तक्त्यात १० वर्षांचे SIP इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न दिले आहेत. यावरून Long Term SIP कशा फायदेशीर ठरतात याचा अंदाज येईल.