yereyerepaisa.com

Mutual Fund

न्यू फंड ऑफर (NFO) म्हणजे काय ?

एन एफ ओ किंवा न्यू फंड ऑफर म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीतर्फे म्युच्युअल फंडाची नवी स्कीम  गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणली जाते. ज्याप्रमाणे कंपन्या पब्लिक इश्यू आणून आपले शेअर्स शेअर बाजारात उतरवतात त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड कंपन्या ज्यावेळी एखादी योजना पहिल्यांदा गुंतवणूकदारांसाठी आणतात तेव्हा त्याला ‘न्यू फंड ऑफर’ असे म्हटले जाते. आपण म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला युनिट्स मिळतात. सर्वसाधारणपणे न्यू फंड ऑफर ज्यावेळी बाजारात येते त्यावेळी दहा रुपयाला एक युनिट या दराने आपल्याला युनिट्स मिळतात.

या ‘न्यू फंड ऑफर’ चे दोन प्रकार पडतात. एक ‘ओपन एंडेड फंड’ म्हणजेच या फंडात तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकता व तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला विकू  शकता. दुसरा प्रकार ‘क्लोज एंडेड फंड’ यामध्ये गुंतवणूकदारांना ठराविक काळ पैसे अडकवून ठेवावे लागतात म्हणजेच त्याला ‘लॉक इन पिरियड’ असतो. तो झाल्यावरच आपल्याला ते पैसे परत मिळू शकतात.