म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांचा हा सगळ्यात कॉमन प्रश्न असतो गुंतवणुकीला सुरुवात तर करायची आहे.
आता माझ्याकडे एक लाख रुपये आहेत मग सगळे पैसे आत्ताच गुंतवू का दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवू ? म्हणजेच एसआयपी सुरू करू ?
समजून घेऊया या दोघांमधला बेसिक फरक
तुम्ही एक रकमी गुंतवणूक केली तर ज्या दिवशी तुम्ही पैसे गुंतवता त्या दिवशीच्या नेट सेट व्हॅल्यू म्हणजेच एन.ए.व्ही.नुसार तुम्हाला युनिट्स मिळतात.
जर तुम्ही एस.आय.पी. या माध्यमातून पैसे गुंतवत असाल तर तुम्ही दर महिन्याला ज्या दिवशी गुंतवणूक करता म्हणजेच तुमच्या बँकेच्या अकाउंट मधून पैसे कट होतात त्या दिवशी NAV असेल त्याचे युनिट तुम्हाला मिळतात.
समजा तुम्हाला दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे आणि तुमच्याकडे एक रकमी काही लाख रुपये उपलब्ध आहेत. तर तुम्ही ते पैसे एकत्र सुद्धा म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. पण समजा शेअर बाजाराची परिस्थिती अस्थिर असेल आज बाजार वर….. उद्या खाली ….एक आठवडा दहा टक्के वर …….दुसऱ्या महिन्यात पाच टक्के खाली अशी परिस्थिती असेल तर मात्र ते पैसे टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये उतरवावेत असा सल्ला दिला जातो.
जर तुमच्याकडे दर महिन्याला ठराविक पैसे हातात उरत असतील तर माझ्याकडे थोडे जास्त पैसे जमले की एकदम म्युच्युअल फंडात ठेवतो असे म्हणण्यापेक्षा दर महिन्याच्या ठराविक तारखेला ते पैसे फंडात जमा करणे हा योग्य निर्णय असतो यालाच एस.आय.पी. असे म्हणतात.
या प्रश्नाचे उत्तर देणे काही वेळा कठीण होऊन बसते.
उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी मागच्या वर्षीपासून २०२४ या वर्षापासून भारतीय शेअर बाजार समाधानकारक रिटर्न्स देत नाहीत असे दिसते आहे. अशावेळी एखाद्या गुंतवणूकदाराला एक रकमी दहा ते पंधरा लाख रुपये गुंतवायचे असतील आणि जर त्याला पाच ते सात वर्षात असते पैसे परत हवे असतील तर इक्विटी फंडातली गुंतवणूक ही खूपच जास्त रिस्क असलेली ठरणार आहे म्हणून अशावेळी थोडे थोडे पैसे टप्प्याटप्प्याने गुंतवावेत असा सल्ला देण्यात येईल.
जर गुंतवणूकदाराचे वय तीस चाळीस असेल तर दर महिन्याला पगारातून जे पैसे मिळतात त्यातून खर्च वजा जाता जे काय थोडेफार पैसे उरतील ते काटेकोरपणे गुंतवले जावेत. ही योजना हवी असेल तर मात्र एस.आय.पी.च्या माध्यमातूनच पैसे गुंतवले पाहिजेत.
पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे पोस्टात किंवा बँकेत आर.डी. उघडली जायची त्याचीच ही म्युच्युअल फंडातील बहीण आहे असे समजा !
शिस्त लागण्यासाठी एस.आय.पी. केव्हाही योग्य.
न्यू फंड ऑफर (NFO) म्हणजे काय ?
एस आय पी करताय ? हे माहित असायलाच हवे !
इक्विटी ….डेट ……आणि हायब्रीड म्हणजे नेमके काय ?
एसआयपी सुरू कशी करायची ?
मल्टी ॲसेटलोकेशन म्हणजे काय ?
तुमच्या पोर्टफोलिओत इक्विटी फंड हवेतच !
इक्विटी फंडांचे प्रकार कोणते ?
इक्विटी ….डेट ……आणि हायब्रीड म्हणजे नेमके काय ?