जीवन विमा नक्की कसा काम करतो ?
आपण एका सुखी आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाचे उदाहरण घेऊया. नवरा-बायको आणि दोन मुले एकत्र सुरक्षित आयुष्य जगत आहेत. नवरा-बायको दोघेही नोकरी करतात व त्यांची मुले आठ आणि दहा वर्षे वयाची आहेत. दुर्दैवाने अपघातात किंवा एखादा अचानकपणे आजार उद्भवून घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले किंवा स्त्रीचे निधन झाले तर कुटुंबातील एक कमावती व्यक्ती नसल्याचा परिणाम दिसायला सुरुवात होते. समजा जी व्यक्ती आपल्यातून गेली आहे ती महिन्याला ५० ते ७० हजार रुपये कमवत असेल तर अचानकपणे तेवढे उत्पन्न कमी होते पण खर्च तर कायमच राहतात.
अशावेळी जीवन विमा असता तर ? अशी भावना मनात येते. आपण ज्या कुटुंबाचे उदाहरण घेतले आहे त्या कुटुंबातील मुलांचे वय लक्षात घेतले तर आपल्याला एक स्पष्टपणे दिसते की अजून दहा ते पंधरा वर्षांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप पैसे लागणार आहेत. मग जर आई किंवा वडिलांचा अचानक मृत्यू झाला तर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार ? त्यांच्यासाठी पैसे कोण खर्च करणार ? हा प्रश्न उभा राहतो.
आजकाल शहरात राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबांनी त्यांचे वन बीएचके किंवा टू बीएचके फ्लॅट बँकांकडून कर्ज काढून घेतलेले असतात. त्या कर्जाचा हप्ताच पुढची १५ ते २० वर्षे भरायचा असतो. मग अशावेळी जर कोणत्याही कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते घराचे हप्ते कोणी भरायचे ? हा प्रश्न उभा राहतो.
या सर्व प्रश्नांवरचे सोपे उत्तर म्हणजे कमावत्या नवरा-बायकोंनी योग्य वेळीच आपल्यासाठी जीवन विमा पॉलिसी विकत घेतली पाहिजे.
मृत्यूनंतर गेलेल्या माणसाचा जीव तर आपण परत मिळवू शकत नाही पण निदान आपल्या कुटुंबाची काळजी तरी आपल्याला करावी लागणार नाही या आत्मविश्वासासहित आपण जगू शकतो. म्हणूनच जीवन विमा आवश्यक आहे.
एस आय पी करताय ? हे माहित असायलाच हवे !
इक्विटी ….डेट ……आणि हायब्रीड म्हणजे नेमके काय ?
न्यू फंड ऑफर (NFO) म्हणजे काय ?
एसआयपी सुरू कशी करायची ?
मल्टी ॲसेटलोकेशन म्हणजे काय ?
तुमच्या पोर्टफोलिओत इक्विटी फंड हवेतच !
इक्विटी फंडांचे प्रकार कोणते ?
इक्विटी ….डेट ……आणि हायब्रीड म्हणजे नेमके काय ?