yereyerepaisa.com

Insurance

लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय ?

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘लाईफ इन्शुरन्स’ म्हणजे जो इन्शुरन्स घेतो तो आणि इन्शुरन्स कंपनी यांच्यात एक कॉन्ट्रॅक्ट असतं. लाइफ इन्शुरन्स कंपनीला आपण दरवर्षी ‘प्रीमियम’ म्हणून पैसे दिले की त्या बदल्यात आपल्याला विमा देण्याचे काम ही कंपनी करते. प्रीमियम भरणाऱ्या पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास त्यानंतर ते पैसे त्याच्या वारसदाराला मिळतात. ज्यांनी जीवन विमा घेतला आहे त्याचा मॅच्युरिटी पर्यंत मृत्यू झाला नाही तर ते पैसे त्या व्यक्तीला परत मिळतात. हे नेमके किती आणि कसे पैसे परत मिळतात हे तुम्ही कोणती इन्शुरन्स पॉलिसी घेता यावर अवलंबून असते. 

काही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये क्रिटिकल इलनेस रायडर, ॲक्सिडेंट बेनिफिट रायडर असे ऑप्शन पण निवडता येतात, तो अर्थातच तुमचा चॉईस असतो. 

कोणकोणत्या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज असतात ?

जीवन विम्याचे प्रकारकव्हरेज
टर्म इन्शुरन्स पॉलिसीफक्त व्यक्तीच्या मृत्यूनंतरच विम्याचे पैसे परत मिळतात
एडोमेंट लाइफ इन्शुरन्स पॉलिसीविमा आणि बचत असा एकत्रित लाभ मिळतो
युनिट लिंक इन्शुरन्स पॉलिसी युलिपइन्शुरन्स कव्हर आणि शेअर मार्केटचे लाभ
रिटायरमेंट प्लॅनइन्शुरन्स कव्हर आणि नियमित बचतीचे फायदे
चाइल्ड प्लानइन्शुरन्स कव्हर आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची तरतूद

विम्याचे प्रकार पुढील प्रमाणे 

टर्म इन्शुरन्स पॉलिसी 

टर्म या शब्दाचा अर्थ मुदत यामध्ये विमा हा पैसे परत मिळवण्यासाठी काढायचा नसून ज्या व्यक्तीचा विमा उतरवला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पैसे मिळावे एवढा उद्देश असतो. म्हणजेच टर्म इन्शुरन्स विकत घेतला तर फक्त मृत्यू पश्चातच विम्याचा लाभ मिळतो. 

एडोमेंट प्लॅन 

एडोमेंट Endowment या इंग्लिश शब्दाचा अर्थ ‘लाभ’ असा आहे 

या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी मध्ये जे पैसे आपल्याकडून प्रीमियम म्हणून दरवर्षी विमा कंपनीला भरले जातात ते पैसे विमा कंपनी गुंतवते आणि आपली पॉलिसी मॅच्युअर झाली की आपल्याला बोनस च्या स्वरूपात पैसे परत मिळतात आणि आपण जेवढ्या रकमेचा विमा उतरवला आहे ते पैसे सुद्धा आपल्याला परत मिळतात. म्हणजेच बचत आणि विमा या दोघांचा संयोग या पॉलिसीमध्ये असतो. 

युलिप पॉलिसी (ULIP)

ज्याप्रमाणे शेअर बाजारात पैसे गुंतवले जातात त्याप्रमाणे युलिप पॉलिसीमध्ये तुमच्या प्रीमियम मधून इन्शुरन्स चे चार्जेस वजा केल्यावर उरलेले पैसे विमा कंपनी शेअर बाजारात गुंतवते. शेअर बाजारात पैसे गुंतवल्यावर जसा शेअर बाजार वर जातो तशी तुमची गुंतवणूक सुद्धा वाढते. युलिप प्रकारच्या योजना इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यांचे कॉम्बिनेशन म्हणून दिल्या जातात. पण यामध्ये एक धोका असतो तो म्हणजे जर शेअर बाजार चांगले रिटर्न्स देत नसतील तर तुमच्या पॉलिसी मधून मिळणारे रिटर्न सुद्धा कमी होतात.