yereyerepaisa.com

Uncategorized

लाइफ इन्शुरन्स कोण विकत घेऊ शकतो ?

शिक्षण झालं, नोकरी लागली, लवकरच लग्न ठरेल ! आता प्रत्येकाने आपल्या आयुष्यात घ्यायचा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे स्वतःची जीवन विमा पॉलिसी काढायची. पण जीवन विमा पॉलिसी नेमके कोण घेऊ शकतात ?

हा प्रश्न बरेचदा पडतो

या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे ‘प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीसाठी’ जीवन विमा पॉलिसी महत्त्वाची ठरते. 

कोणकोणत्या वयोगटासाठी कोणत्या प्रकारचा जीवन विमा आवश्यक आहे ?

वय २५ ते ३५  वर्षे – नुकतेच संसाराला सुरुवात केलेल्या या वयोगटातील व्यक्तींनी टर्म इन्शुरन्स काढणे अत्यंत आवश्यक असते. भविष्यात घर विकत घेताना कर्ज काढले जाते त्यावेळी याचा उपयोग होतो. 

वय ३५ ते ४५ वर्षे – या वयात आपल्यावरची जबाबदारी वाढू लागलेली असते. लग्न झालेले असते किंवा लग्न होऊन मुले झालेली असतात. या वयात आपले इन्शुरन्स कव्हर वाढवणे आवश्यक आहे. जसजसे तुमचे वय वाढते, जबाबदाऱ्या वाढतात तसतसे अधिकचा इन्शुरन्स विकत घेणे आवश्यक आहे. 

वय ४० ते ५० वर्षे – या वयोगटात तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग साठी पावले उचलावी लागतात. अशा वेळी इन्शुरन्स कंपन्यांचे रिटायरमेंट प्लॅन तुम्हाला मदतीचे ठरतात. 

वय ५० व अधिक वर्षे – पन्नाशीनंतर या वयात नवीन लाइफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे फारसे उत्तम मानले जात नाही. कारण पन्नाशीनंतर विमा विकत घेण्यासाठी भरमसाठ प्रीमियम भरावा लागतो. पण ज्यांनी याआधी विमा घेतला नसेल त्यांनी मात्र थोडेसे पैसे बाजूला काढून विमा घ्यायला हवा. 

तुम्ही सिगरेट ओढता  का ?

जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुमच्या जीवाला निश्चितपणे इतरांपेक्षा धोका असतो म्हणून तुम्ही जीवन विमा अवश्य घेतला पाहिजे. जर तुम्ही सिगरेट ओढत असाल तर इन्शुरन्स विकत घेताना कंपनीला प्रामाणिकपणे तशी कल्पना द्या. जर भविष्यात तुमचा मृत्यू झाला आणि तुम्ही सिगरेट ओढत असाल हे नंतर कळले तर तुमच्या क्लेमवर त्याचा निश्चितपणे परिणाम होतो. 

तुम्हाला शुगर किंवा ब्लडप्रेशर आहे का ?

विमा पॉलिसी विकत घेताना तुम्हाला सध्या जे आजार झाले आहेत त्याची माहिती विमा कंपनीला द्यायची असते. त्यामुळे तुमचा प्रीमियम थोडासा वाढतो पण भविष्यात या कारणांमुळे तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला योग्य ते विमा कवच कंपनीतर्फे दिले जाते.