yereyerepaisa.com

Mutual Fund

म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करायचे आहे पण ……….किती रुपयाची एसआयपी सुरू करायची ?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणत्याही तज्ञ व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही ! याचे उत्तर तुम्हालाच माहिती आहे.

कसे ?

पुढील प्रमाणे समजून घेऊया

पुढील प्रश्नांची उत्तरे दिली की आपोआपच तुम्हाला दर महिन्याला किती रुपयाची एस.आय.पी. करायची आहे हे आपोआपच समजेल.

  • तुमचे इन्व्हेस्टमेंटचे टारगेट काय आहे ?
  • तुम्हाला किती वर्षात ते टारगेट गाठायचे आहे ?
  • तुमच्या मते या कालावधीत महागाईचा दर किती असेल ?
  • जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलीत तर तो फंड किती टक्के दराने वाढेल असे तुम्हाला वाटते ?

वरील प्रश्नांची उत्तरे म्हणजेच तुमची एस आय पी ची रक्कम होय.

पुढील तीन फोटोंमधून याचा स्पष्टपणे अंदाज येईल

पंधरा वर्षात ५० लाख रुपये जमा करायचे आहेत. दरमहा १०००० रुपयांची SIP करायला लागेल.

पंचवीस वर्षात १ कोटी रुपये जमा करायचे आहेत. दरमहा ५००० रुपयांची SIP करायला लागेल.

दहा वर्षात १० लाख रुपये जमा करायचे आहेत.  दरमहा ४३००  रुपयांची SIP करायला लागेल.

( जर त्यांची फंडातील गुंतवणूक दरवर्षी १२ टक्क्यांनी वाढली असे गृहीत धरले तर )