yereyerepaisa.com

Mutual Fund

मल्टी ॲसेटलोकेशन म्हणजे काय ?

म्युचुअल फंडात पैसे का गुंतवायचे ? हा विचार केल्यास सोपे उत्तर मिळते ते म्हणजे विविध प्रकारच्या सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवायचे असतात आणि धोका सुद्धा कमी करायचा असतो अशावेळी शुद्ध इक्विटी फंड योजनांपेक्षा मल्टी ॲसेट अलोकेशन या प्रकारच्या फंडाचा विचार केला गेला पाहिजे. असा विचार करा की तुम्हाला शेअर बाजार, सोने, चांदी या सगळ्यांमध्ये एकत्रित गुंतवणूक करायची आहे.

हे शक्य आहे का ? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.

कारण एकाच वेळी शेअर्स, सोने-चांदी आणि डिबेंचर यात गुंतवणूक करणे किचकट ठरेल/ अडचणीचे ठरेल. अशा वेळी मल्टी ॲसेट अलोकेशन फंड तुमच्या मदतीला धावून येतात.

प्रत्येक ॲसेट क्लासचे वेगळे महत्त्व

इक्विटी हा एस ॲसेट क्लास विचारात घेतला तर गुंतवणूक थेट शेअर्स मध्ये केली जाते. म्हणजेच तुम्ही गुंतवलेले पैसे म्युच्युअल फंड थेट शेअर्स मध्ये गुंतवतो. यामध्ये अधिक जोखीम आणि अधिक रिटर्न्स असतात.

या प्रकारच्या ॲसेट क्लासमध्ये सरकारी बॉण्ड्स, कॉर्पोरेट कंपन्यांचे डिपॉझिट यामध्ये गुंतवणूक केली जाते. यात रिस्क कमी आणि रिटर्न सुद्धा कमी.

सोने-चांदी हा ॲसेट क्लास विचारात घेतला तर रिटर्न तसे बे भरवशाचे असतात ! पण एकदा सुरुवात झाली की विक्रमी प्रकारचे रिटर्न्स अशी स्थिती दिसते.

आता या तिघांचे एकत्रित प्रॉडक्ट तयार केले तर मल्टी ॲसेट अलोकेशन फंड तयार होतात.

या फंडात आपण गुंतवलेली रक्कम इक्विटी शेअर्स -डेट इन्स्ट्रुमेंट्स आणि गोल्ड सिल्वर ईटीएफ यांच्यामध्ये गुंतवली जाते. ज्यावेळी शेअर बाजारापेक्षा सोने आणि चांदी यामध्ये रिटर्न्स मिळण्याची शक्यता जास्त आहे असे फंड मॅनेजरला वाटते तेव्हा तो शेअर्समधील इन्व्हेस्टमेंट कमी करून कमोडिटी मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट वाढवतो.

कोणत्या प्रकारच्या ॲसेट क्लासमध्ये किती पैसे गुंतवायचे ? हा निर्णय फंड मॅनेजर आणि त्याची टीम घेत असते. सेबीच्या नियमानुसार प्रत्येक प्रकारच्या ॲसेट क्लास मध्ये कमीत कमी दहा टक्के पैसे गुंतवावेच लागतात. मात्र जास्तीत जास्त किती गुंतवायचे हा निर्णय फंड मॅनेजरचा आहे.

२०२४  ते २०२६ या दोन वर्षात सोने आणि चांदी यांच्या भावात विक्रमी वाढ झालेली आहे. ज्या मल्टी ॲसेट फंडांनी या कमोडिटीज मध्ये गेल्या दोन वर्षात पैसे गुंतवले आहेत त्यांचे रिटर्न्स इतरांपेक्षा जास्त दिसतात.