इन्शुरन्स घेताय ? हे विसरू नका
कमी वयातच जास्त विमा कवच घ्या
वयाचा आणि इन्शुरन्सच्या प्रीमियमचा थेट संबंध आहे. जसजसे वय वाढते तस तशी जोखीम वाढल्यामुळे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला जास्त प्रीमियम आकारते. म्हणून नोकरीला लागल्या लागल्या पुढच्या वर्षीच इन्शुरन्स काढायला विसरू नका.
पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचा
तुम्ही जी विमा पॉलिसी विकत घेतली आहे ती मिळाल्यानंतर त्यातील सगळ्या अटी शर्ती काळजीपूर्वक वाचा. जर तुमच्या गरजेपेक्षा ती पॉलिसी तुमच्या गरजेला मॅच होत नसेल तर तुम्ही ‘कूलिंग ऑफ पिरियड’ मध्ये पॉलिसी परत सुद्धा करू शकता.
रायडर नक्की घ्या
जर तुमचा फिरतीचा जॉब असेल, तुम्ही रोज टू व्हीलर ने फिरत असाल, तुमचे कारखान्यातील यंत्राशी संबंधित काम असेल तर अपघाती विम्याचा पर्याय म्हणजेच एक्सीडेंट रायडर नक्की घ्या. यामध्ये अत्यंत कमी प्रीमियम भरून तुम्हाला मोठे विमा कवच मिळते व अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मोठी रक्कम मिळते.
एकाच कंपनीवर अवलंबून राहू नका
जुन्याकाळी फक्त एकच कंपनी भारतात विमा पॉलिसी देत असे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. तुमचं वय, तुमचं उत्पन्न आणि तुम्ही दर वर्षाला किती रुपये प्रीमियम भरू शकता याची माहिती इंटरनेटवर दिल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या विमा कंपन्यांचे तुलनात्मक आकडे दिसतात त्यांचा अभ्यास करा. कोणती कंपनी कोणकोणत्या सुविधा देते आहे हे तपासून पहा. फक्त एखादी कंपनी कमी प्रीमियम लावते म्हणजेच ती चांगली असेही नाही !
याबाबतीत कंपनीच्या वेबसाईटवरील आणि इंटरनेटवरील फीडबॅक तपासून पहा.
इन्शुरन्स पॉलिसीला नॉमिनेशन ठेवावे का ?
आपल्यासाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी योग्य हे कसे निवडाल ?
इन्शुरन्स घेताय ? हे टाळा
इन्शुरन्स घेताय ? हे विसरू नका
इन्शुरन्स घेताय ? हे विसरू नका
इन्शुरन्स घेताय ? हे टाळा
तुमचे विमा कवच (Risk Cover) नेमके किती असावे ?
आपल्यासाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी योग्य हे कसे निवडाल ?