yereyerepaisa.com

Insurance

इन्शुरन्स घेताय ? हे टाळा

माहिती देताना संकोच नको 

तुम्ही इन्शुरन्स कंपनीला विमा घेताना जी माहिती देता ती संपूर्णपणे खरी असेल असे पहा. जर तुम्ही विम्याची पॉलिसी घेताना कंपनीला अर्धवट किंवा चुकीची माहिती दिली आणि भविष्यात कंपनीला मेडिकल रिपोर्ट मधून किंवा अन्य मार्गाने खरी माहिती समजली तर तुमचा विम्याचा दावा फेटाळला जाऊ शकतो. 

प्रीमियम वेळेवर भरा 

प्रत्येक विमा कंपनी प्रीमियम भरण्यासाठी तारीख निश्चित करून देते. त्या तारखेनंतर १५  ते ३० दिवसांचा ग्रेस पिरियड म्हणजेच जादाचा कालावधी सुद्धा देते. जवळपास सगळ्याच कंपन्या इन्शुरन्सचा प्रीमियम भरा म्हणून ई-मेल आणि एस.एम.एस. द्वारे आठवण सुद्धा करतात अशा वेळी प्रीमियम भरायला विसरू नका. 

इन्शुरन्स विकत घ्यायला उशीर करू नका 

चाळीशी उलटून गेल्यानंतर अचानक पणे इन्शुरन्स घ्यावा असे लोकांना वाटू लागते. तोपर्यंत वय वाढलेले असल्यामुळे इन्शुरन्सचा प्रीमियम सुद्धा खूप महाग झालेला असतो. म्हणूनच उशिराचे शहाणपण नको !

जेवढ्या तरुण वयात इन्शुरन्स घ्याल तेवढा तो स्वस्त पडतो. 

माझे उत्पन्न कमी आहे मग इन्शुरन्स कशाला ?

हा विचार करू नका. तुमचे उत्पन्न कितीही कमी असले तरी कमीत कमी रुपयाची इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. अगदी एक लाख रुपये कव्हर असलेल्या पॉलिसी सुद्धा इन्शुरन्स कंपनीकडून दिल्या जातात.