इक्विटी ….डेट ……आणि हायब्रीड म्हणजे नेमके काय ?
म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आता आपल्याला माहिती आहे. एका कंपनीद्वारे शेकडो हजारो गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून ते एका फंडात गुंतवले जातात व तज्ञ फंड मॅनेजरच्या देखरेखीखाली गुंतवणूक केली जाते.
तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळी तुम्ही गुंतवलेले पैसे फंड मॅनेजर तर्फे नेमके कुठे गुंतवले जातात ? यावरून फंडांचे तीन ठळक प्रकार पडतात.
इक्विटी फंड
इक्विटी फंड – यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे वापरून शेअर्स विकत घेऊन त्याचा पोर्टफोलिओ बनवला जातो. ज्याप्रमाणे तुम्ही डिमॅट अकाउंट उघडून शेअर्स विकत घेता त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडात इक्विटी स्कीम मध्ये लोकांनी गुंतवलेले पैसे म्युच्युअल फंड कंपनी शेअर बाजारात थेट गुंतवते. म्हणजेच वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेते. कोणत्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायचे ? ते कधी विकत घ्यायचे ? कधी विकायचे ? याचा निर्णय फंड मॅनेजर आणि त्याचे एक्सपर्ट टीम घेते.
डेट फंड
‘डेट’ या शब्दाचा सोपा अर्थ ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ‘फिक्स व्याजदर’ मिळतो किंवा अंदाजे किती रिटर्न्स मिळतील हे समजते त्या योजना. आपण डेट फंडामध्ये गुंतवणूक केली तर आपण गुंतवलेले पैसे कंपन्यांचे फिक्स डिपॉझिट बॉण्ड्स, डिबेंचर, सरकारी बॉण्ड्स, रिझर्व बॅंकेतर्फे इशू केले जाणारे बॉण्ड यामध्ये गुंतवले जातात. या डेट प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये शेअर्स घेतले जात नाहीत तर फिक्स रिटर्न देणाऱ्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवले जातात. म्हणून इक्विटी फंडांपेक्षा या फंडांमध्ये रिस्क थोडी कमी असते अर्थात रिटर्न्सही तितकेच कमी असतात.
हायब्रीड फंड
नावातच लिहिलेले असल्याप्रमाणे हायब्रीड म्हणजे वर लिहिलेल्या डेट आणि इक्विटी यांचे कॉम्बिनेशन असलेले फंड म्हणजे हायब्रीड फंड होय. जर तुम्हाला इक्विटी फंडातील रिस्क आणि रिटर्न्स पण हवे आहेत आणि त्याचबरोबर डेट फंडातून मिळणारी सुरक्षितता हवी आहे तर तुम्ही हायब्रीड फंडात गुंतवणूक करायला हवी. ह्या फंडात इक्विटी शेअर्स आणि डेट पर्याय यामध्ये विभागून पैसे गुंतवले जातात. सर्वसाधारणपणे हायब्रीड फंडात ६० % गुंतवणूक शेअर्स मध्ये व उरलेली डेट पर्यायांमध्ये केली जाते. याचा निर्णय फंड मॅनेजर घेणार असतो.
आदर्श पोर्टफोलिओ मध्ये इक्विटी हायब्रीड आणि डेट अशा तिन्ही फंडांचा समावेश केला जातो.
म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करायचे आहे पण ……….किती रुपयाची एसआयपी सुरू करायची ?
आपल्यासाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी योग्य हे कसे निवडाल ?
न्यू फंड ऑफर (NFO) म्हणजे काय ?
एसआयपी सुरू कशी करायची ?
मल्टी ॲसेटलोकेशन म्हणजे काय ?
तुमच्या पोर्टफोलिओत इक्विटी फंड हवेतच !
इक्विटी फंडांचे प्रकार कोणते ?
इक्विटी ….डेट ……आणि हायब्रीड म्हणजे नेमके काय ?